Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

18 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

कर्जत : पोलिसांना वारंवार गुंगारा देणार्‍या आरोपीला अटक करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. कर्जत तालुक्यातील परिटवाडी येथील खुडश्या साहेब्या भोस

शाळकरी मुले पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात
नुपूर शर्माचे समर्थन करणे भोवले ; चार तरूणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

कर्जत : पोलिसांना वारंवार गुंगारा देणार्‍या आरोपीला अटक करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. कर्जत तालुक्यातील परिटवाडी येथील खुडश्या साहेब्या भोसले, वय- 48 वर्ष या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध कर्जत पोलिसात कलम 363, 376, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून आरोपीचा वारंवार शोध घेतला जात होता. मात्र तो नेहमी पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता. शनिवारी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून पोलिसांनी त्यास शनिवारी करपडी गावाचे शिवारातून अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, पोलीस हवालदार संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक कोल्हे, महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे, विशाल क्षीरसागर, होमगार्ड बापू गदादे, सचिन जाधव यांनी ही कारवाई केली.

COMMENTS