Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सौभाग्यवतीला महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री करण्याचा बिगबॉस फेम अभिजित बिचुकलेंनी उचलला विडा 

 सातारा प्रतिनिधी - बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी नेहमीच राज्याच्या राजकारणात धक्कादायक विधाने करत स्वतःला राजकीय पटलावर चर्चेत ठेवले आहे. त्य

गुणरत्न सदावर्तेंना सरकारची सुरक्षा का ?
त्यांचे पुनर्वसन झाले नाही, पण 47 लाखाची माफी मिळणार?
वाढते हल्ले चिंताजनक  

 सातारा प्रतिनिधी – बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी नेहमीच राज्याच्या राजकारणात धक्कादायक विधाने करत स्वतःला राजकीय पटलावर चर्चेत ठेवले आहे. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्यापासून ते थेट राष्ट्रपती होण्याची स्वप्ने देखील पाहिली. आता असेच एक मोठे स्वप्न पाहून त्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतीलाच राज्याच्या पहिल्या महिला  मुख्यमंत्री बनवण्याचा विडा हाती उचलला आहे. एकीकडे सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एका ही महिलेला मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने बिचुकले यांनी महिला मुख्यमंत्री पदाचा उचलल्या मुद्दा महिलांच्या सन्मानाच्या दृष्टीने चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच अभिजित बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्त त्यांनी आपल्या अर्धांगिनी अलंकृता बिचुकले यांना जाहीर पत्र लिहून आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या आहेत त्यांच्या या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून त्यांनी उचलला महिला सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

COMMENTS