बीड प्रतिनिधी - अबॅकस सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ओम लहू साठे मास्टर अबॅकस पदक विजेता ठरला आहे .ओम लहू साठेला अबॅकस तिसर्या लेवल्समध्ये सर्वोत्कृष

बीड प्रतिनिधी – अबॅकस सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ओम लहू साठे मास्टर अबॅकस पदक विजेता ठरला आहे .ओम लहू साठेला अबॅकस तिसर्या लेवल्समध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळवून यशस्वीरित्या सायटेशन आणि पदक मिळवले आहे.त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
शहरातील अबॅकस तथा वैदिक मॅथ आणि रुबिक क्यूब प्रशिक्षण केंद्राद्वारे अनेक विद्यार्थ्यांना बौद्धिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याचे उत्कृष्ट शैक्षणिक कार्य गेल्या काही वर्षापासून सतत अविरत चालू आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास करण्याच्या उद्देशाने अबॅकस गणितीय पद्धतीचा तंत्राच्या द्वारे, वैदिक मॅथच्या द्वारे विद्यार्थ्यांमधील गणिता विषयाची भीती दूर करण्याचे कार्य या प्रशिक्षण केंद्रामधून श्री. डॉ. घोडके ए.एस.मास्टर अबॅकस तथा वैदिक मॅथ ट्रेनर यांच्याद्वारे केले जात आहे. मास्टर अबॅकस विद्यार्थी ओम लहू साठेला अबॅकस तिसर्या लेवल्समध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांक मिळवून यशस्वीरित्या सायटेशन आणि पदक मिळवले आहे .अनेक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा भाग घेण्याची संधी मिळालेली असून दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी अबॅकस आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पियनशिप साठी उत्कृष्ट स्पर्धक निर्माण होण्याचा त्यांनी निश्चय केला असून स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट विजेता होण्याचा विश्वास दाखवलेला आहे . ओम लहू साठेला अबॅकसच्या लेवल परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांकाचे कम्प्लिशन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे . अबॅकस तथा वैदिक मॅथआणि रुबिक क्यूब प्रशिक्षण केंद्रामध्ये ओम लहू साठेने अबॅकस द्वितीय क्रमांकामुळे दिल्ली येथील अबॅकस असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरन एस बी, उडीसा राज्याचे अबॅकस मास्टर ट्रेनर तथा एमडी ऍरिस्टो किड्स उज्वल पांडा, महाराष्ट्र राज्य स्तरावरील विदर्भ अबॅकस प्रमुख अमोल विरवले, तेलंगणा तथा आंध्र प्रदेशच्या प्रमुख आय.सी.एम. एसच्या एमडी श्रीमती वरलक्ष्मी तसेच एम.एम गो.युएसए अमेरिकाचे प्रमुख जॉर्ज स्टीफनहार्ट तथा अबॅकस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. ए एस घोडके यांनी ओम साठेचे अभिनंदन करून उज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ओम म्हणतो की माझ्या अबॅकसच्या अभ्यासामुळे व्यक्तिमत्व विकास होतच असून सकारात्मक दृष्टिकोन तसेच गणिताबद्दलची भीती राहिलेली नाही. आणि सहज सोप्या पद्धतीने अनेक क्लिष्ट गणित सुद्धा मी सहजरित्या सोडवत आहे.
COMMENTS