Homeताज्या बातम्यादेश

आपच्या आमदाराला ईडीने केले अटक

नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळा आम आदमी पक्ष अर्थात आपची पाठ सोडायला तयार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगात असतांना अंमलबजावणी सं

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ
LIVE मुख्यमंत्री.. बारामती इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन
अपयशाने वैफल्यग्रस्त न होता आनंदाने जगा ः रामदास फुटाणे

नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळा आम आदमी पक्ष अर्थात आपची पाठ सोडायला तयार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगात असतांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने सोमवारी आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
वक्फ बोर्ड घोटाळ्याच्या प्रकरणात ही अटक झाल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी सोमवारी सकाळी अमानतुल्लाह खान यांच्या घरावर छापा टाकून त्याची सहा तास चौकशी केली व त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. अमानतुल्ला खान यांनी एक्सवरील पोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. ’ईडी’चे लोक मला अटक करण्यासाठी माझ्या ओखला इथल्या घरी आले आहेत, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या दोन वर्षांपासून तपास यंत्रणा मला सतत त्रास दिला जात आहे. सकाळी सात वाजता ईडी सर्च वॉरंटच्या नावाखाली मला अटक करण्यासाठी आली आहे. माझ्या सासूबाईंना कॅन्सर आहे आणि त्या सध्या माझ्या घरी आहेत. मी ईडीला पत्र लिहिले आहे आणि त्यांच्या प्रत्येक नोटिशीला उत्तरही दिले आहे. तरीही हे सगळे सुरू आहे. आमचा आम आदमी पक्ष संपवणे हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही झुकणार नाही आणि खचणारही नाही, असे खान यांनी म्हटले आहे. दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणातील नियुक्त्या आणि मालमत्ता भाडेतत्त्वावर देण्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीसमोर हजर न राहिल्याबद्दल अलीकडेच ईडीने खान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. खान यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तपासापासून पळ काढला, असा आरोप ईडीने केला होता. एक साक्षीदार म्हणून ते ईडीला हवे होते मात्र त्यांच्या वर्तनामुळे ते स्वत:च आरोपी ठरले आहेत, असे ईडीचे म्हणणे आहे.

नेमका आरोप काय ? – 100 कोटी रुपयांची वक्फ प्रॉपर्टी बेकायदेशीररित्या भाडेतत्त्वावर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. खान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली वक्फ बोर्डावर 32 कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा ही आरोप आहे. या प्रकरणी चार आरोपी आणि एका कंपनीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS