Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी आप मैदानात

आपकडून परभणीत तिसरा उमेदवार जाहीर

मुंबई ः महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दिवाळीआधी होणार की, दिवाळीनंतर होणार याची कोणतीही माहिती नसतांना देखील विविध पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी क

विकासकामांच्या जोरावर डॉ. सुजय विखे बाजी मारतील ः वसंत लोढा
विकासाचे राजकारण…
देवगांवकर हॉस्पीटलतर्फे मोफत किडनी विकार तपासणी शिबीर

मुंबई ः महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दिवाळीआधी होणार की, दिवाळीनंतर होणार याची कोणतीही माहिती नसतांना देखील विविध पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी सात उमेदवार जाहीर केल्यानंतर आता आम आदमी पक्ष अर्थात आपने देखील जोरदार आघाडी घेतली आहे. आपकडून रविवारी परभणीत सतीश चकोर यांच्या रूपाने तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आप उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांबरोबरच आता आपने विधानसभेसाठी कंबर कसली. मराठवाड्यातील तीन जागा आपने जाहीर केल्यात बीड, लातूर पाठोपाठ परभणी विधानसभेचा उमेदवार आम आदमी पार्टीच्या राज्य संघटकांकडून जाहीर करण्यात आला. परभणीत पत्रकार परिषद घेऊन आपचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे देशात जरी आप इंडिया आघाडीबरोबर असली तरी महाराष्ट्रात मात्र ते विधानसभेच्या 288 जागा स्वतंत्र लढणार हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी आप नेत्या प्रीती शर्मा यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आम्ही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. प्रीती शर्मा म्हणाल्या होत्या की, आगामी विधानसभा निवडणुका आम्ही आम आदमी पार्टी एकट्याने लढायच्या तयारीत आहोत.

COMMENTS