चेन्नई प्रतिनिधी - चक्रीवादळामुळे चेन्नईतल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन ठ

चेन्नई प्रतिनिधी – चक्रीवादळामुळे चेन्नईतल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन ठप्प झाले आहेत. बदललेल्या हवामानाचा चेन्नईसह आजुबाजुच्या जिल्ह्यांनाही फार मोठा फटका बसला आहे. या ‘मिचौंग’ या चक्रीवादळामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. खरंतर, या चक्रीवादळाचा फटका फक्त सामान्य नागरिकांनाच नाही तर, काही सेलिब्रिटींनाही बसला आहे. चेन्नईच्या ‘मिचौंग’ चक्रीवादळाचा फटका बॉलिवूड अभिनेता आमिर खान सुद्धा अडकला आहे. या पुरामध्ये, आमिर खानसोबत विष्णु विशाल सुद्धा अडकला होता. त्यांच्या मदतीला काही रेस्क्यू टीम आली आहे.टॉलिवूड अभिनेता विष्णू विशाल आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे आलेल्या पुरामध्ये चेन्नईच्या करापक्कममध्ये अडकले होते. विष्णू विशालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या घरातही पुराचे पाणी शिरल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे घरात लाईट आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे तो खूप मोठ्या संकटामध्ये, सापडल्याचे स्पष्ट केले. त्याने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले की, “माझ्या घरामध्ये पाणी शिरलं आहे. चेन्नईतल्या करपक्कममधील माझ्या घरामध्ये आणि परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. मी मदतीसाठी फोन केला आहे. वीज नाही, इंटरनेट नाही, फोनला नेटवर्क नाही. फक्त टेरेसवर एका विशिष्ट ठिकाणी मला थोडंसं नेटवर्क मिळेल, अशी आशा. मोबाईलला नेटवर्क आलं तर येथील लोकांना काहीतरी मदत मिळेल. मला चेन्नईतल्या लोकांची फार काळजी वाटते. #staystrong.” असं त्याने आपल्या पोस्टमध्ये नमुद केलं आहे.
COMMENTS