Homeताज्या बातम्या

संविधान रक्षकांचा आज एल्गार

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे रण तापत असतांना दुसरीकडे राज्यातील पुरोगामी व विवेकवादी कार्यकर्त्यांना दिल्या जाणार्‍या धमक्यांचा निषेध व्यक

दलितांवर हल्ला करणार्‍यांना त्वरित अटक करा
आनंदोत्सव साजरा करतांना संकटाचेही भान ठेवा!
एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे रण तापत असतांना दुसरीकडे राज्यातील पुरोगामी व विवेकवादी कार्यकर्त्यांना दिल्या जाणार्‍या धमक्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी व लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी आज बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी मंदिर सभागृहात पुरोगामी व विवेकवादी विचारवंतांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता ही सभा होणार आहे. चला, बुलंद करूया आवाज लोकशाहीचा ही सभेची संकल्पना आहे. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी या सभेचे आयोजन केले आहे. राहुल भंडारे व अमोल जाधवराव हे संयोजक आहेत. या सभेला महात्मा गांधी यांचे पणतू, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, नाटककार प्रेमानंद गज्वी, श्यामदादा गायकवाड, निरंजन टकले, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, लोकशाहीर संभाजी भगत हे उपस्थित राहणार आहेत. समस्त लोकशाहीवाद्यांनी समविचारी कार्यकर्त्यांसह या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS