Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या  तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग

अहमदनगर/प्रतिनिधी शहरात खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनय

गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणार्‍या दुकानावर छापा
जम्प रोप स्पर्धेसाठी अहमदनगर संघाची निवड चाचणीः संदीप कोयटे
अतिक्रमणांवर पडतोय हातोडा… रस्त्यांचा श्‍वास होतोय मोकळा..

अहमदनगर/प्रतिनिधी शहरात खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला . ही घटना शनिवारी ता.१ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी   तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   याबाबतची माहिती अशी की जनार्धन वाघमोडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नालेगाव) याने शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता हॉस्पिटल मध्ये नर्सची नोकरी करणारी एक तरुणी हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर जात असताना त्यांचा पाठलाग केला व त्या तरुणीस रस्त्यात गाठून तिच्या सोबत अश्लिल बोलून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला. त्या तरुणीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली असता तो तेथून पळून गेला. त्यानंतर ती तरुणी ड्यूटीवर गेली.. त्यांनी तेथून जनार्धनच्या वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वडिलांना सांगितल्याचा राग मनात धरून जनार्धन ने त्या तरुणीस फोनवर शिवीगाळ केली. ती तरुणी सायंकाळी ड्यूटी वरून परतल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

 या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पिडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून जनार्धन वाघमोडे याच्या विरुद्ध विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहे.

COMMENTS