Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुळया बहिणीं सोबत लग्न करणारा युवक अडकला कायद्याच्या बेडीत

मुंबई : मुंबईतील एका तरुणाने सोलापूरातील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले होते. त्यानंतर या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व

सत्ता स्थापनेसाठी जोर-बैठका
ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला | LOKNews24
वीजचोरीप्रकरणी पश्‍चिम महाराष्ट्रात 7 हजारांवर आकडे जप्त

मुंबई : मुंबईतील एका तरुणाने सोलापूरातील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले होते. त्यानंतर या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यामुळे या विवाहाची राज्यभर एकच चर्चा रंगली. अनेकांनी या तरुणांची खिल्ली उडवली. तर, काहींनी यावर नाराजी दर्शवली. दरम्यान, या लग्नानंतर दुसर्‍याच दिवशी तरुणाच्या आनंदावर विरजन पडले. कारण, महिला आयोगाने याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आता पोलिस चौकशीत या तरुणाचे असे काही कारनामे समोर आले आहेत, जे ऐकूण अनेकांना 440 व्होल्टचा झटका बसलाय.


दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटणारा नवरदेव अतुल अवताडे हा याचे आधीच एक लग्न झाले असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाले आहे. अतुलचे याआधी सुद्धा लग्न झालेले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे याबाबतची तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अतुल अवताडे हा चांगलाच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. अतुल याच्यासोबत सोलापूरातील दोन्ही जुळ्या बहिणांवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिस अतुलची कसून चौकशी करत आहेत. जुळ्या बहिणींशी लग्न करणारा अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील मूळ रहिवासी आहे. त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणार्‍या दोन तरुणी पिंकी मिलिंद पाडगावकर आणि रिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणी आहेत. दोघीही आयटी इंजिनिअर आहेत. पिंकी आणि रिंकीला एकमेकींबद्दल अतिशय ओढा असून आजवर त्या दोघी एकाच ताटात जेवतात असे काही जणांनी सांगितले. बालपणापासून एकत्र राहत असलेल्या पिंकी आणि रिंकीला शेवटपर्यंत सोबतच राहायचे आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. कायम एकत्र राहण्यासाठी त्यांना एकच नवरा हवा होता. अखेर अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली. अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे 2 डिसेंबर 2022 रोजी हा विवाह संपन्न झाला होता. 

COMMENTS