नगरमध्ये काम शोधण्यास आलेला युवक झाला बेपत्ता

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

नगरमध्ये काम शोधण्यास आलेला युवक झाला बेपत्ता

अहमदनगर/प्रतिनिधी : काम शोधण्यासाठी नगरमध्ये आलेला अनिल बाबासाहेब जरांगे हा 31 वर्षीय तरुण कामासाठी औरंगाबाद येथे जातो असे सांगून बुरुडगाव रोडवरील चा

शिर्डी लोकसभा निवडणुकीत मातंग समाज निर्णायक भूमिका घेणार ः जगधने
जोखमीचे काम करणारे सर्पमित्र प्रशिक्षण व सुविधांपासून वंचितच | आपलं नगर | LokNews24 |
धारुर घाटात डॉ. आंबेडकर विकास मंचचा रास्ता रोको l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : काम शोधण्यासाठी नगरमध्ये आलेला अनिल बाबासाहेब जरांगे हा 31 वर्षीय तरुण कामासाठी औरंगाबाद येथे जातो असे सांगून बुरुडगाव रोडवरील चाणक्य चौक येथील मित्राच्या दुकानावरून निघून गेला असून, तो अद्याप परतला नाही. यानंतर त्याच्या मित्रांनी व भावाने अनिल यास फोनवरुन संपर्क केला, परंतु त्याचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे. बेपत्ता तरुणाचे वर्णन असे आहे. नाव- अनिल बाबासाहेब जरांगे (वय 31, रा.मातोरी, ता. शिरूर कासार, जि.बीड), रंग सावळा, उंची 165 सेंटीमीटर, डोक्याचे केस काळे, बारीक दात शाबूत, अंगात शर्ट, काळया रंगाची पॅन्ट घातलेली आहे. अशा वर्णनाचा युवक कोणाला आढळला किंवा त्याच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे (फोन नंबर 0241-2416117) येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS