Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सलग तिसर्‍या दिवशी एका तरूणाची हत्या

पुणे ः पुण्यात सुरू असलेल्या हत्येचे सत्र शनिवारी तिसर्‍या दिवशी देखील सुरूच आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आ

वाढदिवस साजरा करायला आलेल्या तरुणासोबत भयानक कांड
परभणी, बीड प्रकरणी विरोधक आक्रमक ; पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज स्थगित
अपमानाच्या रागातून मुलाने वडील आणि आजोबांची हत्या केली

पुणे ः पुण्यात सुरू असलेल्या हत्येचे सत्र शनिवारी तिसर्‍या दिवशी देखील सुरूच आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या हत्या झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरातील संत गाडगेबाबा शाळेसमोर पारशी मैदानात एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे समोर आले. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

COMMENTS