Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

जामखेड तालुक्यातील धानोरा येथील घटनाजामखेड ः जामखेड तालुक्यातील धानोरा या ठिकाणी अहिल्यानगरहुन नातेवाईकांकडे आलेला तरूणाचा गुरूवारी पोहायला गेला अ

एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने वार ;  गंभीर जखमी; जखेडमधील घटना
निलंबित स्वस्त धान्य दुकानदाराला धान्यपुरवठा?
जामखेडमध्ये ड्रग्ज कनेक्शन ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त 

जामखेड तालुक्यातील धानोरा येथील घटना
जामखेड ः जामखेड तालुक्यातील धानोरा या ठिकाणी अहिल्यानगरहुन नातेवाईकांकडे आलेला तरूणाचा गुरूवारी पोहायला गेला असतांना विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आवेज रिजवान पठाण वय 17 वर्षे असे आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत आवेज रिजवान पठाण वय 17 वर्षे रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर हा जामखेड तालुक्यातील धानोरा या ठिकाणी आला होता. यानंतर दुसर्‍या दिवशी गुरूवार 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आवेद हा आपला चुलत भाऊ अन्वर शौकत पठाण व जय संतोष आरू असे तिघेजण धानोरा येथील घराजवळील विहीरीवर पोहायला गेले असतांना आवेज याने मला पण पोहता येते असे म्हणून विहीरीत उडी मारली. मात्र विहीरीत उडी मारल्यानंतर आवेज हा पाण्याच्या वरती आला नाही म्हणून त्याचा चुलत भाऊ व मित्र या दोघांनी मोठ्याने आरडाओरड केला. यावेळी आवाज एकुण वस्तीवरील नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी ही घटना जामखेड पोलीस स्टेशन व महसूल विभागास कळवली. पिंपरखेड येथील रफीक अब्बास सय्यद वय 54 यांनी 23फुट खोल पाण्यात बुडी घेऊन आवेज याचा मृतदेह पाण्याच्या वरती काढला. सकाळी 8 वाजता बुडालेल्या आवेजचा मृतदेह दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बाज पाण्यात उलटी टाकुन त्यावर मृतदेह ठेऊन दोरीच्या सहाय्याने मृदतेह पाण्यातुन विहिरीच्या बाहेर म्हणजे तब्बल 6 तासांनी बाहेर काढण्यात आला. यावेळी मृतदेह काढण्यासाठी त्यांना घटनास्थळी वाजिद पठाण, हरीदास शिरगिरे, माजी सरपंच बालाजी शिंदे, भाऊराव काळे, लाला शिंदे, बाबुराव वाघ, सिकंदर शेख, सलीम शेख यांनी त्यांना मदत केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कड स. पो.उपनिरीक्षक सलिम शेख, पो. कॉ. जितेंद्र सरोदे, योगेश दळवी, मंडल अधिकारी विजय चव्हाण, पोलीस पाटील योगिनाथ जायभाय, यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी निजाम गणी शेख, रा. धानोरा यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS