Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागडा मोबाईल न घेतल्याने तरुणाची आत्महत्या

जामखेड ः आजकाळच्या तरूणांमध्ये चांगल्याप्रकारची बाईक, त्याचबरोबर महागडा मोबाईल असण्याचे एकप्रकारचे व्यसन लागल्याचे दिसून येत आहेत. मात्र या बाबीं

इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

जामखेड ः आजकाळच्या तरूणांमध्ये चांगल्याप्रकारची बाईक, त्याचबरोबर महागडा मोबाईल असण्याचे एकप्रकारचे व्यसन लागल्याचे दिसून येत आहेत. मात्र या बाबींच्या आहारी तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात ओढला जात आहे, परिणामी पालकवर्गांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जामखेडमध्ये महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी वडीलांनी पैसे न दिल्याच्या रागातून शिक्षकाच्या मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गजानन रामदास उगले, वय 23 रा. नायगाव असे या मुलाचे नाव आहे. गजानन उगले याचा तब्बल 23 दिवसांनी उपचारादरम्यान जामखेड येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की मयत गजानन रामदास उगले याचे वडील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल या शाळेत शिक्षक आहेत. गजानन याने वडीलांकडे महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे मागितले मात्र ते पैसे न दिल्याच्या रागातून गजानन उगले याने 28 एप्रिल 2024 रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्यावर 23 दिवसांपासुन जामखेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गजाननाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती.  त्याला दोन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात देखील येणार होते. मात्र दि 18 मे रोजी सायं 6 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या खबरी वरुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटना खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आसल्याने सदरची नोंद खर्डा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे शुल्लक कारणावरून अनेक तरुण सहजपणे आत्महत्येचे पाऊल उचलताना दिसत आहेत. मोबाईल व सोशल मीडियामुळे देखील मुलांचा चिडचिडपणा वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे व पालकांनी देखील मुलांवर योग्य लक्ष द्यावे असे तज्ज्ञांचे मत आहे.

COMMENTS