Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरूणाचा अत्याचार

सांगली : कोलकाता आणि बदलापूर येथील घटना ताज्या असतांना महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होतांना दिसून येत आहे. सांगली जिल्

भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण
चांदवडला बसचालक वाहकास मारहाण
मुंबईत कॅब चालकाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

सांगली : कोलकाता आणि बदलापूर येथील घटना ताज्या असतांना महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होतांना दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर एका जिमचालक तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंगरेवरही ठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी शुक्रवारी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला मदत करणार्‍या महिलेला अटक केली असून सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.  आरोपींने मुलीवरील अत्याचार केलेल्या कृत्याचे चित्रीकरण केल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती असेही पोलीस तपासात समोर आले आहे. संग्राम देशमुखहा आटपाडी मध्ये जिम चालवत होता. आरोपींकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पध्दतीने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे.

COMMENTS