Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोंढव्यात आढळला विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह

पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेच्या परिसरातील मोकळ्या मैदानात एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण

घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला देण्यावरून वाद
माधवराव बोठे यांचे वृद्धपकाळाने निधन
विलास सहकारी साखर कारखाना युनिट-2 चे रोलर पूजन

पुणे : कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेच्या परिसरातील मोकळ्या मैदानात एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, महिलेची ओळख पटलेली नाही. एनआयबीएम संस्थेच्या परिसरातील मोकळ्या जागेत एक महिला विवस्त्र अवस्थेत पडली असून तिच्या डोक्यात दगड घालण्यात आल्याची माहिती सोमवारी कोंढवा पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळाल्यानतंर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असून तिची ओळख पटलेली नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

COMMENTS