Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोणीत आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ 

नाशिक प्रतिनिधी -  नाशिक-दिंडोरीरोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ  जवळील रस्त्याच्या लगत गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळ

निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन
काँग्रेस नेते थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन महोत्सव
वाळू डेपो विरोधात. आ.गडाख ग्रामस्थांसह मैदानात

नाशिक प्रतिनिधी –  नाशिक-दिंडोरीरोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ  जवळील रस्त्याच्या लगत गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. म्हसरुळ पोलीस ठाण्यात हद्दीत ही घटना घडली आहे. आज सकाळी नाशिक-दिंडोरी रोडवर गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे.

हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज – रस्त्याच्या कडेला संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. महिलेची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

COMMENTS