मुंबई ः विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून शुक्रवारी कामकाजाचा पाचवा दिवस आहे. कामकाजाची सुरूवात होताच विरोधी पक्षातील महिला आमदारांनी म
मुंबई ः विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून शुक्रवारी कामकाजाचा पाचवा दिवस आहे. कामकाजाची सुरूवात होताच विरोधी पक्षातील महिला आमदारांनी मणिपूर घटनेवर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेत मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळाली. मंत्री अभ्यास करुन येत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्यावर कोणी आईच्या पोटातून हुशार होऊन येत नसल्याचे प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिले. या दोघांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुर्चीवरुन उठून शांत केले.
सभागृह सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांचे खातेवाटप होते. यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवरील भार कमी होतो. पण आता प्रत्येक दिवशी खातेवाटप होते. एखाद्या मंत्र्यांला उत्तर देता आले नाही तर टाईमपास होतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, अधिवेशनापूर्ती जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे दिली आहे. त्यांची यादी मी काल सभागृहात वाचून दाखवली. त्यामुळे ह्या प्रश्नाच चर्चा नको. त्यानंतर ठाकरेंवर पलटवार करत गुलाबराव पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे फार अभ्यास करुन आले आहेत. मला माहित आहे. ऐनवेळी सर्व प्रश्न आले. यावेळी आदित्य ठाकरे मध्ये हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांत होते. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, कुणी आईच्या पोटातून हुशार होवून जन्माला येत नाही. तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहित असतील. या वक्तव्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी सर्वांना शांत केले.
COMMENTS