Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उडत्या विमानात दोन वर्षाच्या चिमुकलीला हृदयविकाराचा झटका

नागपूर प्रतिनिधी - बेंगळुरू येथून दिल्लीला विमानाने प्रवास करीत असताना एका दोन वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला. या गंभीर परिस्थितीत व

खांद्यावर हात ठेवून दोघांनी 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन पळवली 
लखनऊमध्ये प्रियांका चोप्राचा निषेध
ओबीसी आरक्षणासाठी लढणार्‍यांना धमक्या ; मंत्री वडेट्टीवार यांचा आरोप

नागपूर प्रतिनिधी – बेंगळुरू येथून दिल्लीला विमानाने प्रवास करीत असताना एका दोन वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला. या गंभीर परिस्थितीत विमानाचे नागपूर विमानतळावर रविवारी रात्री आकस्मिक लॅण्डींग करण्यात आले. मुलीची प्रकृती गंभीर आहे. मुलीवर किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विस्तारा एअरलाइन्सचे यूके८१४ विमान बेंगळुरूहून दिल्लीला जात होते. विमानातील दोन वर्षांच्या मुलीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ती बेशुद्ध पडली. अशा परिस्थितीत याच विमानातून प्रवास करणाऱ्या दिल्ली एम्स हॉस्पिटलचे वरिष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. नवदीप कौर, वरिष्ठ कार्डिक रेडिओलॉजिस्ट डॉ. दमणदीप सिंग, डॉ. रिषभ जैन, डॉ. ओशिखा आणि वरिष्ठ कार्डिक रेडिओलॉजिस्ट अविचला तक्षक या पाच डॉक्टरांनी गंभीर वैद्यकीय परिस्थितीत मुलीला सीपीआर प्रदान करून जीव वाचविण्याच्या उपाययोजना तातडीने सुरू केल्या. तिचे पल्स गायब होते. हातपाय थंड पडले होते. ओठ पांढरे झाले होते. या डॉक्टरांनी तिच्यावर मर्यादित संसाधनाने तब्बल ४५ मिनिटे उपचार केले. त्यादरम्यान तिला पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर तिचा श्वास पुन्हा सुरू झाला. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे विमान कंपनीच्या टीमने आपत्कालीन लँण्डींगसाठी नागपूर विमानतळ प्राधिकरणांशी संपर्क साधला. विमान नागपूर विमानतळावर उतरताच डॉक्टरांनी तिची तपासणी करून पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सने किम्स-किंग्सवे हॉस्पिटल्समध्ये भरती केले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. बालरोग आणि निओनॅटोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. कुलदीप सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीवर उपचार सुरू आहेत.

COMMENTS