Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

अहमदनगर/प्रतिनिधी ः डीएसपी चौकाकडून झोपडी कॅन्टीन कडे भरधाव वेगात जाणार्‍या चारचाकी वाहनाने पुढे चाललेल्या मोटार सायकलला पाठीमागून जोरात धडक दिली

गुजरात मधील आणंद जिल्ह्यात भीषण अपघात
अपघातात तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू
 प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात

अहमदनगर/प्रतिनिधी ः डीएसपी चौकाकडून झोपडी कॅन्टीन कडे भरधाव वेगात जाणार्‍या चारचाकी वाहनाने पुढे चाललेल्या मोटार सायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला. ही घटना पत्रकार चौकात घडली. या बाबतची माहिती अशी की विवेक मनोहर दरवडे हे त्यांच्या मोटार सायकल (क्रमांक एम.एच. 16, डी.डी.9528) ही घेवुन डी.एस.पी. चौकाकडुन झोपडी कॅन्टींगकडे जात असताना पत्रकार चौक येथे आले असता त्यांच्या पाठीमागुन टाटा नेक्सन गाडी ( क्रमांक एम.एच.16, सी.वाय 0389 ) वरील अज्ञात चालक रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवतः येवुन मोटारसायकलला पाठीमागुन धडक दिली त्यामुळे विवेक दरवडे हे मोटारसायकलसह खाली रोडवर पडले तेव्हा त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी विवेक दरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टाटा नेक्सन गाडी (क्रमांक एम. एच. 16. सी. वाय. 0389) वरील अज्ञात चालकाविरुध्द अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली.

COMMENTS