Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्यात उभ्या काळी-पिवळी जीपवर पाठीमागून टेंम्पो धडकला

अपघातात चौघे जखमी

लातूर प्रतिनिधीः- प्रवाश्यांची चढउतार करण्यासाठी उभी असलेल्या काळी - पिवळी जीपला पाठीमागून येणार्‍या टेंम्पोने जोरात धडक दिल्याची घटना शुक्रवारी

दादर परिसरातील छबीलदास शाळेमध्ये सिलेंडर स्फोट  
अतिवृष्टीची भरपाई न दिल्यास जलसमाधी घेणार
शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या.

लातूर प्रतिनिधीः- प्रवाश्यांची चढउतार करण्यासाठी उभी असलेल्या काळी – पिवळी जीपला पाठीमागून येणार्‍या टेंम्पोने जोरात धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता चाकूर तालुक्यातील   महाळंग्रापाटी येथे घडली. या अपघातात चौघे जण जखमी झाले आहेत.
महाळंग्रापाटी येथे काळी-पिवळी जीप क्र एम.एच. 24 एफ 3462 ही लातूरकडून चाकूरकडे येत होती. त्यातील प्रवाश्यांची चढउतार करण्यासाठी महाळंग्रापाटी येथे रस्त्यावर थांबली होती. दरम्यान यावेळी टेंम्पो क्रमांक एम.एच. 22 व्ही.एन.3135 लातूरहून चाकूरकडे जात होता. त्यावेळी टेंम्पोची काळी- पिवळीला पाठीमागून जोरदार धडक बसली. त्यात दोन्ही वाहनाचे चालक व जीपमधील दोघे असे चौघेजण जखमी झाले. काळी – पिवळीचा चालक संगमेश्वर खांडेकर तर टेंम्पोचा चालक अंकूश भोसले आणि जीपमधील प्रवाशी नामदेव जाधव, मैना जाधव अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले आहे. धडक एवढी जोरात होती की अपघात होताच काळी – पिवळी रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्डयात पडली. तर टेंम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पडला. अपघात ऐन पाटीनजिक झाल्याने तेथे दुभाजक नसल्याने टेम्पो उजव्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडला.

COMMENTS