Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवट वनविभागाचा संशयास्पद ’स्टंट’; माल जप्त, पण तस्कर पसार!

वनविभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह; नेमका कोणाला वाचवण्याचा प्रयत्न?किनवट । प्रतिनिधीकिनवट वनविभागाने  शुक्रवारी दि. 30 जानेवारी 20

कंत्राटी विद्युत कामगारांच्या हक्कासाठी मनसे आक्रमक; 2 फेब्रुवारीला नांदेडमध्ये ’ढोल बजाओ’ आंदोलन
किनवटमध्ये शिवसेनेचे युवानेते करण यंड्रलवार यांचा वाढदिवस जल्लोषात; जनसेवेच्या उपक्रमांनी वेधले लक्ष
महसूल आणि पोलीस प्रशासनात समन्वयाचा अभाव

वनविभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह; नेमका कोणाला वाचवण्याचा प्रयत्न?
किनवट । प्रतिनिधी
किनवट वनविभागाने  शुक्रवारी दि. 30 जानेवारी 2026 रोजी गोकुंदा परिसरातील ईदगाह भागात अवैध सागी फर्निचरवर कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी या कारवाईतील ’आरोपी फरार’ झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संशयाचे मळभ दाटले आहे. भरवस्तीत सुरू असलेल्या या अवैध कारखान्यावर छापा टाकताना वनविभागाला आरोपीचा सुगावा कसा लागला नाही, की त्याला पळून जाण्यास वेळ दिला गेला? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
आज दि 30 जानेवारी 2026 रोजी गोकुंदा येथील ईदगाह परिसरात एका अज्ञात इसमाच्या घरासमोर अवैध सागी लाकडापासून सोफा आणि डायनिंग टेबल बनवण्याचे काम सुरू असल्याची ’गुप्त माहिती’ वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने धाड टाकून 162 नग (0.349 घ.मी.) सागी लाकूड, ज्याची किंमत साधारण 7,364/- रुपये आहे, ते जप्त केले (झजठ छे. 01/2026).
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह: आरोपी पळाला की पळवून लावला?
या कारवाईत उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण, आणि वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात होता. बी. टी. जाधव, एस. एम. कोंपलवार, बालाजी झंपलवाड, महेश भोरडे, सुधाकर उंबरहांडे अशा अनुभवी कर्मचार्‍यांचा ताफा असतानाही, भरदिवसा एकही आरोपी जाळ्यात सापडू नये, हे नवलच! एकीकडे वनविभाग आपल्या यशाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात व्यस्त आहे, मात्र दुसरीकडे मुख्य आरोपी फरार होणे हे या कारवाईतील मोठे अपयश मानले जात आहे. लाकूड जप्त करून केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा, या अवैध धंद्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्याला वेळीच का अटक करण्यात आली नाही, याचे उत्तर वनविभागाने देणे गरजेचे आहे.
आगामी काळात काय?
वनविभागाच्या या ’अर्धवट’ कारवाईमुळे गोकुंदा आणि किनवट परिसरात वनतस्करांचे धाबे दणाणण्याऐवजी उलट त्यांना मोकळे रान मिळाल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ’फरार’ झालेल्या त्या अज्ञात आरोपीचा शोध घ्यावा, अन्यथा वनविभागाच्या अशा कारवाया केवळ ’फार्स’ ठरतील.

COMMENTS