सोलापूर : मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- 2024 निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन सोलापूर- नागपूर दरम्यान विशेष गाडी चालवणार आह

सोलापूर : मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- 2024 निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन सोलापूर- नागपूर दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत. सोलापूर – नागपूर आरक्षित विशेष एक्सप्रेस ( 1 सेवा)
गाडी क्र. 01029 विशेष दि. 11.10.2024 रोजी सोलापूर येथून संध्याकाळी 06.00 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.45 वाजता पोहोचेल.
थांबे: सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी, अजनी आणि नागपूर .
संरचना: दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, 08 शयनयान, 06 जनरल, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन सह एकूण 18 डब्बे असतील.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
COMMENTS