Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम

विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराबाबत सखोल मार्गदर्शन; विना हेल्मेट वाहनचालकांवर कारवाईबीड । प्रतिनिधीरस्ते अपघातांमध्ये होणारी वाढती जीवितहानी रोखण्य

महाराष्ट्र बंदला शेतकरी कामगार पक्ष बंदला पाठिंबा – भाई मोहन गुंड
रयत सामाजिक प्रतिष्ठानचा 16वा पुरस्कार वितरण सोहळा 2026 थाटात संपन्न
आदित्य पॉलीटेक्निकच्या दोन विद्यार्थींची भारतीय नौदलात निवड

विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराबाबत सखोल मार्गदर्शन; विना हेल्मेट वाहनचालकांवर कारवाई
बीड । प्रतिनिधी
रस्ते अपघातांमध्ये होणारी वाढती जीवितहानी रोखण्यासाठी तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा वाहतूक शाखा, बीड यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बीड शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना हेल्मेट न वापरल्यास होणारे गंभीर दुष्परिणाम, अपघाताच्या वेळी डोक्याला बसणारा तीव्र आघात, मेंदूला होणार्‍या जखमा व त्यामुळे उद्भवणारे जीवघेणे धोके याबाबत माहिती देण्यात आली. तसेच दर्जेदार व प्रमाणित (आयएसआय)  हेल्मेट वापरल्यास अपघाताच्या वेळी जीव वाचण्याची शक्यता किती पटींनी वाढते, हे उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. हेल्मेट ही केवळ कायद्याची अट नसून ते जीवनरक्षक कवच आहे, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. आज अनेक तरुण केवळ फॅशन किंवा गैरसमजामुळे हेल्मेट टाळतात; मात्र हा निष्काळजीपणा स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण करतो, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट इशारा दिला की, विना हेल्मेट दुचाकी चालवणार्‍या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये दंडात्मक कारवाईसह आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल. कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही, असेही सांगण्यात आले. वाहन चालवताना केवळ हेल्मेटच नव्हे तर वेगमर्यादा पाळणे, ट्रिपल सीट टाळणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे तसेच वाहतूक सिग्नल व नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहनही करण्यात आले. या जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे अंमलदार उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. जिल्हा वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, या माध्यमातून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS