Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुर्ला परिसरातील १२ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई प्रतिनिधी - मुंबईमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मुंंबईतील कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्

मुंबईत २१ मजली इमारतीला भीषण आग
राजधानी दिल्लीत आगीचा भडका
भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग

मुंबई प्रतिनिधी – मुंबईमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मुंंबईतील कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये ३९ जण जखमी झाले असून इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुर्ला परिसरात (Kurla) भीषण आगीची घटना समोर आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर हॉस्पिटलसमोरील १२ मजली इमारतीमध्ये शुक्रवारी (१६, सप्टेंबर) मध्यरात्री आग लागली. या इमारतीत जवळपास ५० ते ६० लोक अडकले होते. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्वांना बाहेर काढले. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. यामुळेच स्थानिकांना त्रास होवू लागला. ३९ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे

COMMENTS