Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणाच्या नावाने पोकळ बैठकांचे सत्र

छत्रपती संभाजीराजे यांचे टीकास्त्र

मुंबई ः राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंद

जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का
कर्जत-जामखेडच्या 158 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठणार
मोक्षप्राप्तीचा सुकर मार्ग म्हणजे भागवत ग्रंथ -हभप मोहन महाराज खरमाटे

मुंबई ः राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र आरक्षणाच्या नावाने पोकळ बैठकांचे सत्र सुरू असल्याची टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
या सर्वपक्षीय बैठकीला संभाजीराजे अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवलेली पाहायला मिळाली. अशातच संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आरक्षण प्रश्‍नी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती मिळत आहे. संभाजीराजे छत्रपतींनी स्वतः यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाबाबतची कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज पहिल्यांदाच बैठकीला अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले होते चर्चेचा विषय ठरला होता.
सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थित राहण्याच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षणापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS