Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी पारधी समाजाच्या समस्या बाबत चर्चासत्र संपन्न

आदिवासी पारधी समाजाच्या विविध मागण्यांवर तोडगा काढणार- आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित.

अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी पारधी समाजाच्या समस्या व विविध मागण्या बाबत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आदिवासी पारधी समाजाची बैठक पार प

तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, ०५ जून २०२१ l पहा LokNews24
पोलिस ठाण्यांमधील मुद्देमाल असुरक्षित?… होणार आता तपासणी
पिंपरी निर्मळ येथील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी पारधी समाजाच्या समस्या व विविध मागण्या बाबत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आदिवासी पारधी समाजाची बैठक पार पडली यामधे आदिवासी पारधी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विधानसभा महाराष्ट्र अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी प्रमुख मार्गदर्शक आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन केले व महाराष्ट्रातील पारधी समाजाच्या अनेक समस्या मागण्या आहेत ते त्यांनी समजून घेतल्या व त्यातून मार्ग काढू असे आश्वासन संपूर्ण महाराष्ट्रातील पारधी समाजाला देण्यात आले यावेळी बैठकीला उपस्थित आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, पारधी समाज संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र काळे, नितीन भोसले, नामदेव भोसले, जितेंद्र काळे, राहुल भोसले, नवनाथ भोसले, रामसिंग भोसले, श्याम भोसले, स्वप्निल पवार, किरण काळे, अक्षय भोसले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS