अहमदनगर : 'तू मला नेहमी पैसे का मागतो' असे म्हणत शिवीगाळ करून एकाने रिक्षा चालकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून जखमी केले. त्याच्या साथीदा
अहमदनगर : ‘तू मला नेहमी पैसे का मागतो’ असे म्हणत शिवीगाळ करून एकाने रिक्षा चालकाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून जखमी केले. त्याच्या साथीदारांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ घडली. आवेश बिलाल शेख (वय २३ रा. गाडेकर गल्ली, भिंगार) असे मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. आवेश शेख हे मिरवली पहाडाच्या पायथ्याला रिक्षा उभी करून भाड्याची वाट पाहत असताना संशयित आरोपी दुचाकीवरून तेथे आले. रेहान अत्तार याने शेख यांना तू नेहमी मला पैसे का मागतो असे म्हणत शिवीगाळ करत धारदार हत्याराने डोक्यात वार केला.
त्याच्या साथीदारांनी लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आवेश शेख यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रेहान अमीन अत्तार (रा. मोमीन गल्ली, भिंगार), कामरान सलीम खान, फरहान सलीम खान, इफजान शेख (तिघे रा.आलमगीर, भिंगार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अंमलदार ए. एन. नगरे हे करत आहेत.
COMMENTS