नाशिक प्रतिनिधी - संजीवनी बँक्वेट हॉल नांदूर नाका या ठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील छावा क्रांतिवीर सेनेच्या दहाव्या वर्ध
नाशिक प्रतिनिधी – संजीवनी बँक्वेट हॉल नांदूर नाका या ठिकाणी एक जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील छावा क्रांतिवीर सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या संदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीसाठी नाशिक,त्रंबकेश्वर, इगतपुरी,सिन्नर,येवला,निफाड नांदगाव,मालेगाव,देवळा,सटाणा, कळवण,दिंडोरी तसेच नाशिक शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते नाशिक जिल्हा हा येणाऱ्या दहाव्या वर्धापन दिनाचा आयोजक जिल्हा असल्याकारणाने वर्धापन दिनाच्या संदर्भात पूर्वतयारीच्या आढावा बैठकीचे नियोजन आज करण्यात आले होते.यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने येणारा वर्धापन हा ऐतिहासिक भव्य दिव्य करण्याचा मानस व्यक्त केला त्याचबरोबर तालुका निहाय बैठका घेऊन जास्तीत जास्त शाखेचे उद्घाटन कसे होईल सभासद संख्या कशी वाढेल त्याचबरोबर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवड लवकरात लवकर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लवकर तालुका निहाय जिल्ह्याचा दौरा करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करायचे आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण शेतकरी कामगार सहकार या क्षेत्रामधील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी येणाऱ्या वर्धापन दिनात भूमिका घेण्यात यावी असा ठरावही एक मताने आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
वर्धापन दिनासाठी विशेष अतिथी म्हणून कोण कोणाला निमंत्रित करायचे यासाठी ही सर्वांनी सूचना द्याव्यात तसेच आपल्या परिचयातील समाज घटकातील मान्यवरांना या अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यासाठी एक कमिटी ही गठीत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना गैरसोय होणार नाही तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी१० वर्धापन दिन संघटनेचा असावा यासाठी ठिकाण लवकरात लवकर ठिकाण निश्चित करून त्याची माहिती इतर जिल्ह्यांना द्यावी तसेच वर्धापन दिनाच्या संदर्भात वेगवेगळ्या विविध कामाच्या कमिट्याही पुढच्या मीटिंगमध्ये निवड करून द्याव्यात.असे ठराव आजच्या मीटिंगमध्ये पारित करण्यात आले आहे.या मीटिंगसाठी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छावा क्रांतिवीर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात अवकाळी मुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या मदतीसाठी,वाढती महागाई, बेरोजगारी,मराठा आरक्षण, यासारख्या विषयांवर आक्रमकपणे आंदोलने निवेदन मोर्चे काढून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करा संघटनेचे विचार तळागाळातील घटकापर्यंत पोहोचविणे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही सगळ्यांनी यशस्वी करून दाखविण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे
करण गायकर संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना
COMMENTS