श्रीरामपूर :श्रीरामपूर हे आधुनिक आणि सर्वसमावेशक शांततामय शहर असून या शहराच्या जडणघडणीवर आधारित ’वैभवशाली श्रीरामपूर’ हे पुस्तक ऐतिहासिक, सामाजिक

श्रीरामपूर :श्रीरामपूर हे आधुनिक आणि सर्वसमावेशक शांततामय शहर असून या शहराच्या जडणघडणीवर आधारित ’वैभवशाली श्रीरामपूर’ हे पुस्तक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार, शिक्षण, साहित्य इत्यादी क्षेत्राच्या माहितीच्या दृष्टीने अनेकांना दिशादर्शक ठरणारे असल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष नीतीन दिनकर यांनी व्यक्त केले.
इंदिरानगर येथील पत्रकार अॅड. बाळासाहेब तनपुरे यांनी दिवाळी फराळ आणि साहित्य परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता, त्याप्रसंगी नीतीन दिनकर बोलत होते. तनपुरे यांनी सर्वांचे स्वागत करून, उपस्थितांचा परिचय करून दिला. तसेच नीतीन दिनकर यांच्या आईविषयीच्या लढवय्या आणि नेतृत्वशील आठवणी तनपुरे यांनी विविध प्रसंगातून स्पष्ट करून वाचन संस्कृती जोपासण्याचे कार्य डॉ. उपाध्ये हे तन-मन- धन अर्पण करून कित्येक वर्षापासून कसे करतात ते कथन केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना ’वैभवशाली श्रीरामपूर’ हे पुस्तक दिवाळी भेट स्वरूपात दिले. यावेळी पत्रकार करण नवले, माजी प्राचार्य किसनराव वमने, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील, रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिक्षक लहानू रहाणे, आनंद बुधेकर, बाळासाहेब शिंदे, अभिषेक दरंदले, तुळशीराम अहिरे आदी उपस्थित होते.
वाचन संस्कृती ही माणुसकीची कार्यशाळा : डॉ. बाबुराव उपाध्ये
याप्रसंगी डॉ. उपाध्ये यांनी ’वैभवशाली श्रीरामपूर’ पुस्तकाची जन्मकथा आणि पुस्तकनिर्मिती मागील भूमिका स्पष्ट केली.2022 पासून या पुस्तकाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील होतो, त्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले, अनेकांनी लेख, फोटो, माहिती इत्यादी संदर्भात सहकार्य केले. अनेकांना अजूनही खूप अनुभव सांगायचे आहेत, त्यासाठी पुन्हा पुस्तक प्रसिद्ध करणार असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले. श्रीरामपूर शहरात मी 1977-78 पासून साहित्यक्षेत्रात अनुभव घेत असून लेखन व उपक्रम घेत आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. कारण ही संस्कृती ज्ञानसंस्कृती आहे, ही संस्कृती म्हणजे माणुसकीची कार्यशाळा आहे. ती प्रतिष्ठित व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS