Homeताज्या बातम्यादेश

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आता हायकोर्टात होणार सुनावणी

नवी दिल्ली ः औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्यानंतरही हा वाद काही संपण्याची चिन्हे नाही. या नामांतराच्या मुद्दयाला अनेकांनी विरोध केला अ

सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या | LOKNews24
धीरेंद्र शास्त्री विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार
अल्पवयीन तरुणीचा इंस्टाग्रामने केला घात 

नवी दिल्ली ः औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्यानंतरही हा वाद काही संपण्याची चिन्हे नाही. या नामांतराच्या मुद्दयाला अनेकांनी विरोध केला असून, याप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून, उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
औरंगाबाद शहराचे ’छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्याला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या प्रकरणी उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. यामुळे याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात जावे. असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. हे प्रकरण सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आले होते. औरंगाबाद शहराचे नाव बदलून ’छत्रपती संभाजीनगर’ असे प्रस्तावित करणार्‍या औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या 4 मार्च 2020 च्या पत्राला केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मान्यतेला याचिकेत आव्हान दिले आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ अधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला बाजू मांडली. सराफ म्हणाले की, हे प्रकरण 27 मार्च 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयासमोर सूचीबद्ध करण्यात आले होते, तेव्हा न्यायालयाने निर्णय घेतला की ती याचिका स्वीकारणार नाही.

COMMENTS