पुणे ः पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अॅण्ड रन प्रकार नुकताच घडलेला असताना त्यापासून कोणताही धडा न घेता, भरधाव वेगात वाहन चालवून दुसर्यांना इजा

पुणे ः पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अॅण्ड रन प्रकार नुकताच घडलेला असताना त्यापासून कोणताही धडा न घेता, भरधाव वेगात वाहन चालवून दुसर्यांना इजा पोहचविण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. अशाचप्रकारे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सोमटणे फाटा येथे एका तरुणाने भरधाव वेगात थार गाडी चालवून दुचाकीस पाठीमागून धडक देऊन तरुणाच्या थेट अंगावरुन गाडी घालत तरुणाच्या मृत्युस जबाबदार झाल्याची घटना घडली आहे. विरभद्र रामराव शिरोळे (वय-38, रा.वराळे, तळेगाव दाभाडे,पुणे) असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयुर जालींदर साखरे(वय-30,रा. हिंजवडी, पुणे) या तरुणावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भादवि कलम 304 (अ), 337, 338, 279 सह मोटार वाहन अधिनियम 119, 177, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयताची पत्नी प्रियंका विरभद्र शिरोळे (वय-35) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
COMMENTS