Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील अट्टल चोरटा बारा तासात जेरबंद

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील कळंबी येथील 73 वर्षीय महिलेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पोबारा करणार्‍या एका अट्टल चोरट्याला औंध पोलिसांनी अ

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
बहे घटनेतील जखमी सचिन पाटील यांचा मृत्यू
ईश्‍वरपूर प्रीमियर लीग 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत सचिन इलेव्हन विजेता

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील कळंबी येथील 73 वर्षीय महिलेच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावून पोबारा करणार्‍या एका अट्टल चोरट्याला औंध पोलिसांनी अवघ्या बारा तासात जेरबंद केले. सुधीर उर्फ सुधाकर अशोक मोहिते (रा कोतीज, ता. कडेगांव, जि. सांगली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, कळंबी ते औंध रस्त्यावरून शेतातून घरी जात असताना काळया रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात अट्टल चोरटयांनी कळंबी येथील सिंधू बाळासो देशमुख (वय 73) यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किंमतीची बोरमाळ हिसकावून चोरुन नेली होती. याबाबतची तक्रार सिंधू देशमुख यांनी औंध पोलीस स्टेशनला दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून औंध पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश वाघमोडे यांनी पोलीस पथकासह तपासास सुरूवात केली. अवघ्या बारा तासात एका आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले.
यामध्ये सुधीर उर्फ सुधाकर अशोक मोहिते (रा. कोतीज, ता. कडेगांव, जि. सांगली) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता प्रकाश श्रीरंग जाधव (रा. माधळमुठी, ता. खानापूर) या अट्टल संशयिताचे नाव ही चोरीत निष्पन्न झाले आहे. मात्र, अद्यापही तो फरार आहे. दोन्ही संशयित अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, विटा, इस्लामपूर, कोकरूड, आटपाडी, तासगाव या पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर घरफोडी व जबरी चोरीचे 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
दोन्ही संशयित आरोपींंवर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकास अटक करण्यात आली आहे तसेच त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.

COMMENTS