शेवगाव ः शेवगाव आगारातून मिरीमार्गे राहुरीकडे जाणार्या एसटी बसची सकाळी साडेनऊचे सुमारास मळेगाव शिवारातील वीट भट्टी जवळ जोरात धडक होऊन झालेल्या

शेवगाव ः शेवगाव आगारातून मिरीमार्गे राहुरीकडे जाणार्या एसटी बसची सकाळी साडेनऊचे सुमारास मळेगाव शिवारातील वीट भट्टी जवळ जोरात धडक होऊन झालेल्या अपघातात बालकाचा जागेवर मृत्यू झाला आहे. श्लोक गणेश वनवे (वय 9) हे मृत बालकाचे नाव असून तो सायकलवरून घरी चालला होता. त्याच वेळेस शेवगावहून येणार्या एम एच 40 वाय 5428 या एसटी बसने त्यास जोरात धडक दिली. तेव्हा त्याच्या डोक्याला जबर मार लागला. श्लोकचे मामा अंकुश कैलास फुंदे यांना हे समजताच त्यांनी त्याला शेवगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे त्याचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एसटीचा चालक शहादेव लक्ष्मण गोरे याच्याविरुद्ध हयगयीने व अविचाराने तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात गाडी चालविल्याच्या कारणावरून श्लोक वनवे यास जोरात धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याची तक्रार श्रोकचे मामा फुंदे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिस नाईक उमेश गायकवाड अधिक तपास करीत आहेत. श्लोक हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS