सातारा / प्रतिनिधी : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लो
सातारा / प्रतिनिधी : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लोकशाही अमृत महोत्सव व ‘वंदे मातरम’ उत्सव अंतर्गत राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन लोकशाही गणराज्याचा प्रारंभ झाला असून 2025 मध्ये या लोकशाही प्रवासाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या प्रेरणादायी भावनेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्ही घटनांचे औचित्य साधून लोकशाही, संविधानिक मूल्ये, हक्क-कर्तव्ये, प्रतिनिधींची निष्ठा व देशाची एकात्मता यावर चिंतन व प्रबोधन, विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये रुजविणे व मराठी भाषेतून विचार व्यक्त करण्यास प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही स्पर्धा प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनाने घेतली जात आहे’ अशी माहिती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी दिली. ही स्पर्धा विद्यालयीन गट 8 वी ते 10 वी महाविद्यालयीन गट 11 वी ते पदवी व पदव्युत्तर वर्ग व खुला गट शिक्षक, संशोधक, कोणीही भारतीय नागरिक तीन गटात घेतली जात आहे.

COMMENTS