Homeताज्या बातम्यादेश

बंगळुरूमध्ये चालत्या बसला आग

बंगळुरू ः बंगळुरूमधील एमजी रोडवर मंगळवारी (9 जुलै) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चालत्या बसला आग लागली. बसमध्ये 30 जण होते. चालकाच्या प्रसंगावधानाम

एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल
चक्क अभियंत्याला कंत्राटदाराने दिली इनोव्हा कार भेट
उदयनिधींच्या ’त्या’ वक्तव्याने राजकारण पेटले

बंगळुरू ः बंगळुरूमधील एमजी रोडवर मंगळवारी (9 जुलै) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चालत्या बसला आग लागली. बसमध्ये 30 जण होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचे प्राण वाचले. त्यांनी वेळीच रस्त्याच्या मधोमध बस थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती दिली. प्रवाशांनी बसमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये बसमधून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. तर अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS