Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनखेड गावात मागील तीन दिवसांपासून माकडाने घातलाय धुमाकूळ

या माकडाने आतापर्यंत 50 ते 60 जणांचा जखमी केले दोन दिवसानंतर माकडाला पकडण्यात वनविभागाला यश आल आहे

लातूर प्रतिनिधी - लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सोनखेड गावात मागील तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. या माकडाने आतापर्यंत 50

तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी जैन मुनींनी केला प्राणत्याग
कराड शहरात काही तासात 4 टन कचरा गोळा
इंजेक्शन न मिळाल्याने रुग्णाचे नातेवाइक रस्त्यावर

लातूर प्रतिनिधी – लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सोनखेड गावात मागील तीन दिवसांपासून एका माकडाने धुमाकूळ घातला आहे. या माकडाने आतापर्यंत 50 ते 60 जणांचा जखमी केले आहे. जखमींमध्ये महिला, पुरुष तसेच वयोवृद्ध लोकांचा समावेश आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.  सोनखेड गावातील नागरिकांनी या माकडाला हाकलून लावण्याचे प्रयत्न केले. पण या माकडाने अनेक नागरिकांच्या अंगावर झडप घालत त्यांना जखमी केले. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी वनविभागाला  या माकडाची माहिती दिली. दोन दिवसानंतर माकडाला पकडण्यासाठी वन विभागाचे 50 हून अधिक कर्मचारी गावात दाखल झाले. त्यांनी गावाला घेराव घातला. मात्र, हे माकड पळून जाण्यास यशस्वी ठरलं.

COMMENTS