Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी पसार

संगमनेर ः संगमनेरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अध

एकाच आठवड्यात चार दुचाकी लंपास
सिव्हिल’मधील आगीच्या घटनेचा तपास झाला ठप्प
मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले |

संगमनेर ः संगमनेरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम 4, 6 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विशाल संपत बोर्‍हाडे (रा. माधवनगर, राजापूर रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो पसार झाला आहे.
या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी (दि. 11) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिच्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा विशाल बोर्‍हाडे याने गैरफायदा घेतला. मुलीला त्याच्या घरी घेऊन जात त्याने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. 4 जून संध्याकाळी ते 10 जून या कालावधीत तसेच यापूर्वीही दोन-तीन वेळा बोर्‍हाडे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले असल्याचे पीडित मुलीच्या आईने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वास भान्सी हे अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS