Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत २१ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई प्रतिनिधी - मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात असलेल्या धवलगिरी इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ८ आणि १२ व्या मजल्यावर ही आग लागली आह

कुर्ला परिसरातील १२ मजली इमारतीला भीषण आग
भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग
राजधानी दिल्लीत आगीचा भडका

मुंबई प्रतिनिधी – मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात असलेल्या धवलगिरी इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ८ आणि १२ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनेची महिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ जंबो टँकरसह स्थानिक पोलीस दाखल झालेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग भीषण असल्याने ‘लेव्हल २’ घोषित करण्यात आले आहे. ८ व्या आणि १२ व्या मजल्यावर आग लागल्याने येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर काही नागरिक टेरेसवर पळाले होते. रहिवासी इमारतीला आग लागल्याने मजल्यावर अडकलेल्या आणि टॅरेसवर अडकलेल्या वक्तींना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेत कुणाला दुखापतही झालेली नाही. ज्या मजल्यावर आगीने पेट घेतला तेथील घरांतील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन्स, फर्निचर, घरगुती वस्तू, दरवाजे सर्वकाही जळून खाक झालं आहे

COMMENTS