Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील सात्रळ-तांभेरे रस्त्यावर वारुळे वस्ती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडल्याची घट

डॉ. सूरज शरदराव गडाख यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित
अवैध खनिज कारवाईत 22 लाख रूपयांचा दंड
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील सात्रळ-तांभेरे रस्त्यावर वारुळे वस्ती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडल्याची घटना 17 जुन रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली आहे. मयत बिबट्या बाबत गणेश डुकरे, सुनिल कदम यांनी प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.म्हस्के यांनी वनविभागास माहिती दिली. अज्ञात वाहनाने राञीच्या वेळी बिबट्यास जोराची धडक दिली.या धडकेत बिबट्या जागिच ठार झाला आहे.हि घटना सोमवारी सकाळी 6 वाजता उघडकीस आली आहे. म्हस्के यांनी वन विभागास माहिती दिल्यानंतर राहुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे, वनपाल एल. पी. शेंडगे, यांनी राहुरी वनविभागाचे वनरक्षक शंकर खेमनर ,वनकर्मचारी दिवे, झावरे, पठाण, वाहन चालक चारुदत्त गायकवाड घटनास्थळी येवुन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृत बिबट्याला वनविभागाच्या रोपवाटिकेत नेले. यावेळी मृत बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

COMMENTS