Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला; 24 कोकरांचा मृत्यू; 7 कोकरे जखमी; 4 कोकरे लंपास

इस्लामपूर / प्रतिनिधी : कापरी (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या जबरी हल्ल्यात 20 कोकरांचा मृत्यू झाला. 7 कोकरे जखमी झाली आहेत 4 कोकरांना बिबट्याने ने

पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोर्‍या उघडकीस
दूध उत्पादनात भारताने पटकावला प्रथम क्रमांक
ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट

इस्लामपूर / प्रतिनिधी : कापरी (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या जबरी हल्ल्यात 20 कोकरांचा मृत्यू झाला. 7 कोकरे जखमी झाली आहेत 4 कोकरांना बिबट्याने नेली आहेत. ही घटना बुधवारी कापरी येथील सिध्देश्‍वर मंदिर परिसरात पाझर तलाव जवळील श्रीकांत जयसिंग पाटील यांच्या शेतात घडली.
रेड येथील मेंढपाळ सुभाष तांदळे यांची मेंढरे पाटील यांच्या शेतात बसविण्यात आली होती. कोकराना त्यांनी कुंपण वजा तात्पुरता आडोसा केलेला होता. काल तांदळे हे त्यांच्या राखणीसाठी दिवसभर थांबले होते. सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर जेवण आणण्यासाठी ते गावाकडे गेले असता त्याचा फायदा घेत शेजारच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कोकराना ठेवलेल्या कुंपणावरुन उड्डी मारत त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात 20 कोकरांचा मृत्यू तर 7 कोकरांना बिबट्याने जखमी केले तर चार कोकरांना बिबट्याने लंपास केले आहे. कोकरांचा आवाज ऐकून शेताचे मालक श्रीकांत पाटील यांनी शेताकडे धाव घेतल्यावर बिबट्याने पळ काढला. मेंढपाळ सुभाष तांदळे यांनी हे विदारक चित्र पाहताच टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच निवासी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनरक्षक बाबा गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

COMMENTS