पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाला पाडले भगदाड !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पनवेलमध्ये ज्वेलर्सच्या दुकानाला पाडले भगदाड !

6 लाखांचे दागिने लंपास

पनवेल प्रतिनिधी - पनवेल(Panvel) मधील कामोठे सेक्टर(Kamothe Sector) 10 मधून चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. कामोठे सेक्टर 10 मधील लक्ष्मी ज्वेलर्सवर

कुरिअरच्या कार्यालयात एक लाखाची चोरी
चक्क मित्रानेच केली मित्राच्या घरी चोरी
केडगावमध्ये भरदिवसा तीन तोळ्याचे दागिने लांबविले

पनवेल प्रतिनिधी – पनवेल(Panvel) मधील कामोठे सेक्टर(Kamothe Sector) 10 मधून चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे. कामोठे सेक्टर 10 मधील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला. यावेळी दुकानातून जवळपास 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास करण्यात आली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. काही अज्ञात व्यक्तींनी रात्री भिंतीला मोठा बोगदा पाडला आणि ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करून जवळपास 6 लाखांचे चांदीचे दागिने लंपास केले. सोन्याच्या दागिन्यांचे कपाट फोडता न आल्याने सुदैवाने ते वाचले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही आणि इतर बाबींच्या माध्यमातून चोरांचा तपास सुरू आहे.

COMMENTS