Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात हॉटेलची तोडफोड करत लुटले

कारवाईस आलेल्या पोलिस निरीक्षकालाही मारहाण

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने घातलेला धुमाकूळ आणि त्यानंतर वाढलेली गुंडगिरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्‍न अ

टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये प्राची पवारने फडकविला तिरंगा
आतिशी यांची तब्येत खालावली
अग्नी क्षेपणास्त्राचे जनक आर.एन.अग्रवाल यांचे निधन

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने घातलेला धुमाकूळ आणि त्यानंतर वाढलेली गुंडगिरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्‍न अजूनही तसाच असल्यो दिसून येत आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत कोल्हेवाडी येथे सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करून कामगारांना मारहाण करत पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, वैभव इक्कर (वय 22, रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. वैभव इक्कर व त्याचा एक साथीदार एका हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी कर्मचार्‍यांसोबत अगोदर हुज्जत घालून दारुच्या बाटल्या फोडल्या. तसेच काही वेळानंतर त्यांंनी हॉटेलमधील कामगारांना मारहाण करत फ्रीज, काचेचे दरवाजे, दारुच्या बाटल्या यांसह इतर वस्तूंची तोडफोड करत सुमारे एक ते दिड लाखाचे नुकसान केले. यावेळी गुन्हगाराने गल्ल्यातील पंचवीस ते तीस हजार रुपये काढून घेतले. धक्कादायक म्हणजे याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी आलेले हवेली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनाही गुन्हेगाराने मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याचे तब्बल तीन गुन्हे दाखल असून इतरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

COMMENTS