बीड । प्रतिनिधी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये भव्य अभिवादन रॅली व सभा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रम शनिवार, 3 जानेव
बीड । प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये भव्य अभिवादन रॅली व सभा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रम शनिवार, 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता सुरू होईल.
रॅलीचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप भोगले, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे व सहाय्यक संचालक डी.बी. क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये नालंदा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप रोडे, ओबीसी परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप उपरे, सनदी लेखापाल बी.बी. जाधव, राष्ट्रीय कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. राम गायकवाड, अण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उत्तम पवार व यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश वाघ यांचा समावेश आहे. रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू होईल आणि माळीवेस चौक, सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड येथे संपेल. रॅलीच्या समारोपानंतर सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात भव्य अभिवादन सभेचे आयोजन आहे. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, नानाभाऊ हजारे व अजय बहीर उपस्थित राहणार आहेत. सर्व सामाजिक संघटना, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षण, स्त्रीमुक्ती व सामाजिक समतेच्या विचारांचा प्रसार करतील. आयोजकांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS