अकोले प्रतिनिधी :अकोले तालुक्या तील राजूर येथे दर वर्षी प्रमाणे डिसेंबरच्या शेवटचे आठवड्यात देशी विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन यावेळी २
अकोले प्रतिनिधी :अकोले तालुक्या तील राजूर येथे दर वर्षी प्रमाणे डिसेंबरच्या शेवटचे आठवड्यात देशी विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन यावेळी २१ ते २४ डिसेंबर रोजी भरणार आहे. स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे दुःखद निधन झाल्यामुळे एक आठवडा हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्या ची माहिती सरपंच सौ पुष्पाताई निगळे उपसरपंच संतोष बनसोडे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे यांनी दिली. राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत, पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी- विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन भरत असते. या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी, संगमनेर, जुन्नर, सिन्नर आदी तालुक्यांतून हजारो जनावरे खरेदी विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात. नगर, नाशिक, मालेगाव, सटाणा, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी येथे दाखल होत असतात. सलग चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात हजारो नागरिक आपली हजेरी लावत असतात. विविध व्यावसायिक आपली दुकाने यात मांडत असतात. या सर्व माध्यमातून या प्रदर्शनात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.-या प्रदर्शनात अनेक भागातून लाखो लोकांची उपस्थित रहाते यात करमणुकीचे खेळ,रहाट पाळणे,लहान मुलांचे आकर्षण असते अनेक व्यावसायिकांचे दुकाने खेळणी ,खाद्य पदार्थ विक्री चे दुकाने थाटली जातात
COMMENTS