Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिसाळलेल्या कुञ्याने चाव्यानेे आठ गायींसह शेळीचा मृत्यू

उपजीविकाचे साधन गेल्याने शेतमजुराने केली नुकसान भरपाईची मागणी

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः देवळाली प्रवरा शहरामधील चव्हाण वस्ती भागात काही दिवसापूर्वी मध्यराञीच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत ए

राहुरी तालुक्यात वीज पंप चोरणारी तिसरी टोळी जेरबंद
BREAKING: महाराष्ट्र लॉकडाउन…. New guidlines | पहा Lok News24
आईच्या स्मृतीदिनी मोफत रुग्ण सेवा देणारे डॉ. विजय काळे

देवळाली प्रवरा /प्रतिनिधीः देवळाली प्रवरा शहरामधील चव्हाण वस्ती भागात काही दिवसापूर्वी मध्यराञीच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत एका शेळीसह आठ गायींना चावा घेतल्याने त्या सर्व मृत्यूमुखी पडल्याने शेतकर्‍यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या एका पथकाने या कुञ्याचा शोध घेतला परंतू पिसाळलेले कुञे मिळाले नाही.
        देवळाली प्रवरा श्रीरामपूर मार्गावरील चव्हाण वस्ती भागात काही दिवसापुर्वी एका पिसाळलेल्या कुञ्याने शेतकर्‍यांच्या पशुधनास चावा घेतल्याने एका शेळीसह आठ गायी मृत्यूमुखी पडल्या आहेत. पिसाळलेले कुञे चावल्या नंतर शेतकर्‍यांनी  जखमी पशुधनावर खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या कडून उपचार केले. परंतू उपचारास पशुधनाचा प्रतिसाद न मिळाल्याने एका पाठोपाठ एक गायी मृत्यूमुखी पडत गेल्या. गायींना लसीकरण करून घेतलं होते. परंतु त्याचा फायदा काही झाला नाही. पिसाळलेल्या कुञ्याने शंकर पांडुरंग चव्हाण, सुभाष मच्छिंद्र जाधव,सर्जेराव भास्कर चव्हाण,शंकर रायभान चव्हाण,अकबर इब्राहिम शेख,प्रकाश कादे, भारत पठारे,संजय बापूराव जाधव, आदी शेतकर्‍यांच्या पशुधनास तर रामभाऊ गायकवाड यांच्या शेळीला चावा घेतला होता.या पशुधनावर औषधोपचार करुनही पशुधन मृत्यूमुखी पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यापैकी बरेच शेतमजूर असून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह दुधधंद्यावरच चालत होता. उदरनिर्वाहाचे साधनच गेल्याने आता शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने याची गंभिर दखल घेवून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतमजुरांच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हा परीषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी माञ शेतमजुरांचे पशुधन मृत्यूमुखी पडलेले असतानाही फिरकलेच नाही. देवळाली प्रवरात जिल्हा परीषदेचा पशु दवाखाना असुन अडचण नसुन खोळंबा अशी अवस्था आहे. येथिल पशुवैद्यकीय अधिकारी कधीही जागेवर सापडत नाही. ते कधी येतात व कधी जातात हेच शेतकर्‍यांना समजत नाही. देवळाली प्रवरा शहर शिवसेना (ठाकरे गट) शहराध्यक्ष अनिल चव्हाण,अभिजीत मुसमाडे. शिवसेना ठाकरे गटाचे युवा शहराध्यक्ष मनीष देठे. संदीप कदम. शिवाजी मुसमाडे.कार्तिक देशमुख.सुभाष पठारे आदींनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देवून पिसळलेल्या कुञ्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मुख्याधिकारी आहेर यांनी तात्काळ आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ यांना आदेश देवून आरोग्य विभागाचे कर्मचारी घेवून कुञ्याचा शोध घेण्यास सांगितले. पिसाळलेल्या कुञ्याचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने शेतकर्‍यांना पशुधनासह व नागरीकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS