Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘वाद्यरंग’ महोत्सवात अहिल्यानगर जिल्ह्यातील दुर्मिळ पारंपारिक लोककलांचे दर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रभादेवी मुंबई येथील कलांगणच्या व्

नागसेन बुद्ध विहार येथे संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात
दिव्यांग नेमके शिक्षक की प्रशासन ? झेडपीतील ‘महा’घोटाळा समोर…
देवळाली येथील आरक्षित जागेवर हस्तांतरणीय विकास हक्क गैरव्यवहाराबाबत चौकशी करून अहवाल सादर करा – सभापती प्रा.राम शिंदे
Displaying 1003004386.jpg

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रभादेवी मुंबई येथील कलांगणच्या व्यासपीठावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव, श्रीगोंदा, राहुरी, नेवासा तालुक्यातील दुर्मिळ व पारंपारिक लोककलावंतांनी आपली विविध रंगी कला सादर करून सप्तरंगाची उधळण केली.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमास वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सांस्कृतिक खात्याचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, सहसंचालक श्रीराम पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककला अभ्यासक व मुक्त पत्रकार भगवान राऊत यांच्या पुढाकारातून रामनगर शेवगाव येथील स्मशान जोगी लक्ष्मण शेंडरे, हनुमंता कडमींचे, डक्कलवार धर्मा कांबळे, रामा यशवंत वीर, नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील गोंधळी दिगंबर गोंधळी, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पिंगळा जोशी दिलीप वायफळकर, बालाजी वायफळकर, श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई येथील शामराव शिंदे, मारुती शिंदे, राजू शिंदे व शिवाजी थिटे आदी कलावंत घाटोळे, शंख, किंगरी, संबळ, दिमडी, गुडगुडी, सारंगी आदी दुर्मिळ व पारंपारिक वाद्य घेऊन सहभागी झाले होते.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरा शेजारी कलांगण परिसरात विविध दुर्मिळ व पारंपारिक वाद्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते फीत कापून या प्रदर्शन व वाद्यरंग महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांना विविध दुर्मिळ व पारंपारिक वाद्य तसेच महाराष्ट्रातील विविध पारंपारिक लोककलांबद्दल माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते विधिनाट्य व इतर पुस्तकाचे प्रकाशन तसेच टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

वाद्यरंग हा अतिशय उत्तम कार्यक्रम असून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये विविध पारंपारिक लोककला व लोकवाद्यांचे उच्च स्थान आहे. वाद्यरंग महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व लोक कलावंतांचे त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमास अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राचे माजी कार्यक्रमाधिकारी बाबासाहेब खराडे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्यसचिव ॲड. कॉम्रेड सुभाष लांडे पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तथा कवयित्री रीता जाधव यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कलावंतांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या कलेचे कौतुक केले.

या कार्यक्रमात पालघर व ठाणे जिल्ह्यातील विविध आदिवासी पाड्याहून तारपा, तुर, गांगळी, डाक, सुरथाळ, सनई, संबळ अशी वाद्य घेऊन विवाह सुनाड, अर्जुन नडगे, जाना देऊ, वाजे लक्ष्मण, गोविंद गंगा, गोविंद सिताराम, बर्फ तुकाराम खरपडे, राजन वैद्य असे कलावंत सहभागी झाले होते.

त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अनेक आदिवासी बंधू भगिनी डेरा, मादळ, नगरा सारखी वाद्य घेऊन सहभागी झाले होते.

COMMENTS