Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकरसारखं हत्याकांड ?

तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करुन उड्डाणपुलाखाली टाकले

देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापड

ह.भ.प. गोविंद महाराज शिरोळे यांना इंडियन पिनाकल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 
“या” शहरात मिसळले जाते पेट्रोलमध्ये पाणी | LOKNews24
शाळांना २ मे पासून ११ जूनपर्यंत उन्हाळी सुटी

देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा श्रद्धा हत्याकांडाची आठवण झाली आहे. मृतदेहाचे अनेक तुकडे सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.15 वाजता उड्डाणपुलाजवळ मानवी शरीराचे काही अवयव पडून असल्याची माहिती त्यांना मिळाली. अनेक ठिकाणी अवयव विखुरले होते. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही

COMMENTS