Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जर्मनीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिली भेट

मुंबई : जागतिकस्तरावर नाविन्यता परिसंस्था अधिकाधिक परस्परांशी जोडल्या जात  आहेत या पार्श्‍वभूमीवर जर्मनीतील कार्लस्रुहे शहराच्या प्रतिनिधीमंडळाने

शेतकर्‍यांना अग्रिम पीकविमा देण्यासाठी सुनावणी घ्या
कोरोना व्यवस्थापनावर महापालिका करणार संशोधन
काँग्रेसचा मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्धार; वडेट्टीवारांकडून मोठी घोषणा !

मुंबई : जागतिकस्तरावर नाविन्यता परिसंस्था अधिकाधिक परस्परांशी जोडल्या जात  आहेत या पार्श्‍वभूमीवर जर्मनीतील कार्लस्रुहे शहराच्या प्रतिनिधीमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिलेली भेट ही महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात नाविन्यताधारित विकासाबाबत वाढत असलेल्या सहकार्याचे द्योतक ठरली आहे.
जर्मनीतील कार्लस्रुहे हे शहर अग्रगण्य तंत्रज्ञान व नाविन्यता केंद्र म्हणून ओळखले जाते. कार्लस्रुहे शहराच्या व्यवसाय विकास विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीचा उद्देश स्टार्टअप्स, प्रगत उत्पादन, कौशल्यविकास आणि धोरणाधारित उद्योजकता या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन सहकार्याच्या संधींचा शोध घेणे हा होता. या भेटीतील संवादादरम्यान दोन्ही भागातील स्टार्टअप परिसंस्थेच्या व्यापक चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञानाधारित उद्योगवाढ, औद्योगिक व उत्पादन क्षेत्रातील नाविन्यता, कौशल्यविकास तसेच उद्योजकतेसाठी सार्वजनिक धोरणांची भूमिका या विषयांवर सविस्तर विचारमंथन झाले. शाश्‍वतता, नाविन्यता प्रशासन आणि चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी भारत व जर्मनी सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. भविष्यातील भागीदारी ही केवळ औपचारिक भेटींपुरती न राहता संयुक्त कार्यक्रम, सामायिक नाविन्यता उपक्रम आणि स्टार्टअप्स व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी अधिक सशक्त बाजारपेठ प्रवेशाच्या संधी निर्माण करणारी असावी, असे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्रात नाविन्यता क्षमतेचा विकास करण्यासाठी राज्य नाविन्यता सोसायटीकडून दिल्या जाणार्‍या सहाय्य, परिसंस्था उभारणी  आणि आंतरराष्ट्रीय संलग्नतेबाबत त्यांनी माहिती दिली. जर्मन प्रतिनिधीमंडळाने कार्लस्रुहे येथील नाविन्यता मॉडेलविषयी माहिती देताना संशोधन संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील घनिष्ठ समन्वयावर भर दिला.

COMMENTS