Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सिंहगड रोडवर फळविक्रेत्याची हत्या

पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील सिंहगड रोडवर कोयता गँगकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यातच आता किरकटवाडी परिसरात एका फळविक्र

राजकीय वैमनस्यातून नराधमांनी आख्ख्या कुटुंबाला संपवलं  
पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
जिवलग मित्रानेच संयमी मित्राचा धारधार शस्त्राने केला खून

पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील सिंहगड रोडवर कोयता गँगकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यातच आता किरकटवाडी परिसरात एका फळविक्रेत्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नांदेड फाट्याजवळील कालव्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे, त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
राहुल आटोळे असे हत्या करण्यात आलेल्या फळविक्रेत्याचे नाव आहे. त्याची हत्या कुणी आणि कशामुळे केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज चेक केले जात असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नांदेड फाट्याजवळील कालव्यात राहुल आटोळे नावाच्या फळविक्रेत्याचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय स्थानिकांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला आहे. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेतला जात आहे. राहुल आटोळेच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्या खांद्यावर आणि पोटावर खोल जखमा आहेत. काही दिवसांपूर्वीच सिंहगड रोडवर महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता तरुणाची हत्या करण्यात आल्याने किरकटवाडी, सिंहगड रोड आणि नांदेड फाटा या परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील सिंहगड रोड, कात्रज, मांजरी, हडपसर, नाना पेठ आणि कोथरुडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगकडून सातत्याने नागरिकांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना समोर आलेल्या आहे. त्यामुळे पोलिसांनी दहशत माजवणार्‍या आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता सिंहगड रोडवर फळविक्रेत्या तरुणाची हत्या करण्यात आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS