चंद्रपूर/प्रतिनिधी ः चंद्रपुरमध्ये अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षाच्या मुलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेवरा बिटातील ब

चंद्रपूर/प्रतिनिधी ः चंद्रपुरमध्ये अंगणात शौचास बसलेल्या पाच वर्षाच्या मुलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेवरा बिटातील बोरमाळा येथे बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात वाघाने मुलास तोंडात धरून पळ काढला. हर्षद संजय कारमेंगे (5, रा. बोरमाळा) असे बालकाचे नाव आहे. सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रांतर्गत येणार्या गेवरा बिटातील बोरमाळा येथील ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.
COMMENTS